Movement

कर्नाटकामधे हंपी असे एक ठिकाण आहे. तिथे फार जुने असे विठ्ठल मंदिर आहे. पाचशे वर्षापूर्वी पुरंदरदास नावाचे एक विठ्ठलाचे परम भक्त होऊन गेले. त्यानी विठठलावरती हजाराहून जास्त गाणी रचली. हे मंदिर फार सुंदर आहे, तिथे संगीत वाजवणारे दगडी खांब आहेत. तसेच, विठ्ठलासाठी एक दगडी रथदेखील आहे. मंदिराचे बांधकाम "हेमांडपंथी" शैलीतले आहे.जेव्हा हंपीवर मुस्लिमानी आक्रमण केले, तेव्हा तिथला विठ्ठलाची मूर्ती लपवत छपवत एका छोट्या गावात आणली, तेच पंढरपूर!! तेव्हा ते मंदिर "स्तूप" असेल वा नसेल. विठ्ठल मात्र कर्नाटकातलाच!!!पटत नसेल तर जुन्या संताच्या या ओळी बघा!!"कानडा ओ विठ्ठलू कर्नाटकू" "कानडा राजा पंढरीचा"

No comments:

Post a Comment